नवीमुंबई गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल कडून सराईत घरफोडी गुन्हेगारास अटक करून रात्रीच्या घरफोडीचे ऐकूण ३५ गुन्हे उघडकीस आणले
पनवेल /प्रतिनिधी :नवीमुंबई येथील तळोजा खारघर परिसरात रात्रीच्या वेळे दुकानाचे शटर तोडून घरफोडी च्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती .सदर प्रकाराने तेथील व्यापारी लोक त्रस्त झाले होते .त्यांच्या मध्ये असुरक्षितेची भावना झाली होती .अशया वेळीं नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग ,मा.अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये ,मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे यांनी वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते .त्यानुसार मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे आरोपी स.पो.नि.प्रवीण फडतरे,पो.उप.नि.वैभव साहेब व पथक यांच्या मदतीने आरोपी नामे आब्दुल सईदबकरीद खान वय ३० रा.ठी.१५ नं गल्ली ,३० फूट रस्ता मंडाला मानखुर्द यास अटक करून नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील ऐकूण ३१ व मुंबई आयुक्तालयातील ४ असे ऐकूण ३५ रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून इतिहास रचला आहे.अदयाप पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐकाच वेळी घरफोडी चे गुन्हे उघडण केल्याचे प्रथम च घडले आहे .त्या पैकी *२७ गुन्ह्या मधील घटनास्थळ वरील cctv फुटेज मध्ये आरोपीचे चित्रण मिळाले आहे* .
३५ गुन्ह्यापैकी
*तळोजा पोलीस ठाणे चे ऐकूण १३ गुन्हे
* खारघर पोलीस ठाणे चे ऐकूण ०७ गुन्हे
*पनवेल शहर पोलीस ठाणे चे ऐकूण ०४ गुन्हे
*पनवेल तालुका पोलीस ठाणे चे ०२ गुन्हे
*नेरुळ पोलीस ठाणे चे ०२ गुन्हे
* सी.बी.डी. पोलीस ठाणे चा ०१ गुन्हा
* रबाळे पोलीस ठाणे चा ०१ गुन्हा कोपरखैरने पोलीस ठाणे चा ०१ गुन्हा
* मुंबई आयुक्तलंय मधील ४ गुन्हे
असे ३५ रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यातील मुद्दमालही हस्तगत करण्यात आला आहे