महावितरण कार्यालयाशेजारी आढळला एका इसमाचा मृतदेह
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः पनवेल जवळील भिंगारी येथील महावितरण कार्यालयाशेजारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, उंची साडेपाच फुट, रंग सावळा, चेहरा चौकोनी, बांधा मध्यम, डोक्याचे केस काळे व तपकीरी, नाक सरळ, मिशी व दाढी वाढलेली व काळी, उजव्या हाताला भगव्या व लाल रंगाचे धागे बांधलेले आहेत. तर डाव्या हाताला जुन्या जखमेचे व्रण आहे. अंगावर फक्त खाली लुंगीसारखे कापड आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.एस.एन.कुडावकर यांच्याशी संपर्क साधावा.