पत्रकार मित्र असोसिएशन व विहान ग्रुप यांच्यावतीने दसऱ्यानिमित्त श्रीखंड व अन्न वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करून गोर – गरिबांना विविध प्रकारे मदत करणारी संस्था म्हणून पत्रकार मित्र असोसिएशन कार्यरत आहे. विविध सणांना घरी बनवलेले पदार्थ गरिबांपर्यंत कसे पोहचवता येतील व ते पदार्थ खाल्ल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल हा हेतू संस्थेचे अध्यक्ष व विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक यांचा नेहमी समाजकार्य करताना राहिला आहे. समाजसेवेचा हा अखंड वसा घेत पत्रकार मित्र असोसिएशन व विहान ग्रुप यांच्यातर्फे आज दसऱ्याच्या निमित्ताने पनवेल मधील विविध गरीब बस्ती असलेल्या ठिकाणी श्रीखंड तसेच पत्रकार संतोष आमले व कैलास रक्ताटे यांच्या सहकार्यातून वेज पुलावचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष तथा विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक, पत्रकार सनीप कलोते, संतोष आमले, कैलास रक्ताटे, रोहन सिनारे, दिपाली पारसकर आदी उपस्थित होते. पत्रकार मित्र असोसिएशन व विहान ग्रुप यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.