उरण ते करंजा S T सेवा सुरु.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांकरिता उरण S T डेपोतुन सकाळी 10 वाजता करंजा करिता बस सेवेचे उदघाटन करण्यात आले .त्याप्रसंगी उरण आगाराचे व्यवस्थापक उदय जुवेकर ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक नरेंद्र भुंडे ,विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन के एल कोळी ,मुख्याध्यापक ए टी पाटील सर,पालक ,विद्यार्थिं व शिक्षक वर्ग उपस्थित होता.सदर सेवेचा लाभ चारफाटा,डाऊर नगर ,मुळेखंड ,गणेश नगर,चाणजे येथील विद्यार्थ्यांना होणार आहे.सदर वेळी चेअरमन सिताराम नाखवा यांनी डेपो व्यवस्थापक उदय जुईकर विनंती केली की S T
ची सेवा करंजा नाक्यापर्यंत (करंजा धक्का )झाली तर ग्रामस्थ व प्रवासी यांना सुद्धा S T चा लाभ घेता येईल.त्यावेळी त्यांनी सागितले की एस.टी.फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास एस.टी.सेवा करंजा धक्या पर्यंत सुरु करता येईल. सध्या तरी कस्टम चाळी पर्यंत एस टी सुरू राहील.या सेवेचा ग्रामस्थांनी सुद्धा लाभ घ्यावा.