शिवसेनेने करून घेतली वाड्यांमध्ये औषध फवारणी
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः तालुक्यातील टेंभोडे, वळवली, सागवाडी, वाघाचीवाडी या गावामध्ये शिवसेनेच्या प्रयत्नाने औषध फवारणी करून घेण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व शहर प्रमुख डी.एन.मिश्रा आदींनी कळंबोली, प्रभाग क्र. 9 येथील ग्रामीण भाग टेंम्बोडे, वळवली, सागवाडी, वाघाचीवाडी या गावांमध्ये मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांवरील औषध फवारणी करून घेतली त्या प्रसंगी शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर, उपतालुका संघटक सौ टिया अरोरा धुमाळ, विभाग प्रमुख आकाश शेलार, उपविभाग प्रमुख दीपक कोडवते, मेघनाथ भोईर, अंकुर पाटील,उपशाखा प्रमुख विकास पेटकर, विभाग संघटक नरेश उलवेकर, सुमित सूर्यवंशी व प्रशांत वाडकर, बबन वाघ ज्येष्ठ शिवसैनिक टेंभो़डे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सदर फवारणीसाठी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी अमित जाधव व त्यांच्या कर्मचाार्यांनी विशेष सहकार्य केल्याने शिवसेनेने त्यांचे आभार मानले आहेत.