खारघर पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या,
पनवेल/प्रतिनिधी:नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील चोरी या सदरखालील गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. श्री बिपीन कुमार सिंह मा. पोलीस आयुक्त साो, श्री महेश घुर्ये मा. अपर पोलीस आयुक्त साो. (गुन्हे) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी दिलेले आदेशाप्रमाणे श्री सुरेश मेंगडे, मा. पोलीस उप आयुक्त साो., गुन्हे व श्री विनोद चव्हाण मा. सहा. पोलीस आयुक्त साो., गुन्हे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष – 3 गुन्हे शाखे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व पथक कडून मालमत्तेच्या संदर्भातील गुन्हयांचा समांतर तपास सुरु होता.
वाशी पोलीस ठाणे गुरक्र. 364/2021 भादंवि कलम 379 या गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळी भेट देवून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज यांचे आधारे सदर गुन्हयाचा तपास करित असताना व दिनांक 25/10/2021 रोजी सपोनि खरोटे व अंमलदार पोहवा कोळी, पोना पाटील, जेजूरकर, जोशी, मोरे, फुलकर असे तळोजा परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना भारत वजन काटयाजवळ वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचे वर्णनाशी मिळता जुळता ईलेक्ट्रीक केबल ड्रम मोटार ट्रक क्र. एम एच 46 ए आर 7669 मधून वाहतूक करित असताना आढळून आल्याने सदर पोलीस पथकाने मोटार ट्रक थांबवून त्यामधील ईसम नामे राजपत राममिलन गौड याचेकडे सदर ट्रकमधील ईलेक्ट्रीक केबलचा बंडलबाबत चौकशी करता, त्याने ट्रकमधील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. नमुद इसमास विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल व अधिक तपास करता, त्याने सदरचा ईलेक्ट्रीक केबलचा बंडल त्याचा साथीदार नामे शानू उर्फ हनिफ रा. शिवडी, मुंबई याचे सहाय्याने मनी मार्केट, वाशी नवी मुंबई येथून चोरी करुन सदरचा बंडल भाडयाने घेतलेला मोटार ट्रक क्र.एम एच 46 ए आर 7669 मध्ये ठेवला होता. सदर चोरी केलेल्या मालाची विल्हेवाट लावेपयर्ंत सदरचा ट्रक तळोजा परिसरात ड्रायव्हर यास पार्क करण्यास सांगून आज रोजी सदर मालाची विल्हेवाट लावणेकरिता घेवून जात असल्याचे आरोपीकडे केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आल्याने वाशी पोलीस ठाणेकडे चौकशी केली असता, सदरचा माल हा वर नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आले असून त्याचेकडून खालील मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.
जप्त मुद्देमाल
अ.न किंमत (सुमारे) वर्णन
1. 6,82,416/- 22 के.व्ही.300 चै. एम. एम. ची 500 मीटरचा एक पिवळया रंगाचा केबल ड्रम, त्यामध्ये काळया रंगाची ईलेक्ट्रीक केबल. जु.वा.किं.सु.
2. 10,80,000/- लाल रंगाचा मोटार ट्रक, त्याचा परिवहन क्रमांक – एम एच 46 ए आर 7669, इंजिन क्र. 697TC69PUY114224, चेसिस क्रं. MAT393033F1P28491 असा असलेला.
3. 1000/- सॅमसंग कंपनीचा सोनेरी रंगाचा DUOS असे नाव असलेला मोबाइल फोन आय एम ई आय नं. 1) 350447142795268, 2) 352811622795262 त्यात व्होडाफोन कंपनीचे सीम कार्ड नं. 8652782474 जु.वा.किं.सु.
*17,63,146/- एकूण किंमत*
अटक आरोपीचे नाव व पत्ता – राजपत राममिलन गौड उर्फ कल्लु, वय 28 वर्षे, सध्या रा. सपेरा बिल्डींग, तळमजला, पोलीस चौकीचे पुढे, भाजी मार्केट जवळ, कौसा- मुंब्रा, जि. ठाणे, मुळ रा. ग्राम बेहरगडी, पो. शाहगंज, थाना दिदारगंज, ता. फुलपूर, जि. जौनपूर, राज्य उत्तर प्रदेश यास दिनांक 25/10/2021 रोजी 15.30 वाजता अटक करण्यात आले असून दि. 26/10/2021 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायालय, वाशी येथे रिमांडकामी हजर करण्यात आले असून आरोपीस दि. 29/10/2021 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
अटक आरोपीवर यापुर्वी दाखल गुन्हयांची माहिती –
1) वालीव पोलीस स्टेशन 183/2015 भादंवि कलम 395,341,323,504,506
2) काशिमिरा पोलीस ठाणे 1234/2015 भादंवि कलम 395,363,511
पाहिजे आरोपीचे नाव – शानू उर्फ हनिफ रा. शिवडी, मुंबई
1) पनवेल शहर पोलीस स्टेशन 236/2019 भादंवि कलम 379,34
सदर अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांचा पूर्व इतिहास तपासला असता या आधी देखील त्यांचेवर वरीलप्रमाणे नवी मुंबई व ठाणे परिसरात गुन्हे दाखल असून त्यांचे वर्तन गुन्हेगारी स्वरुपाचे आहे.
सदर कामगिरीकरीता कक्ष-03, गुन्हे शाखेचे वपोनि शत्रुघ्न माळी, सपोनि/ईशान खरोटे, सपोनि शेंडगे यांचेसह पोलीस अमलदार यांनी महत्वपुर्ण कामगीरी बजावलेली आहे.