प्रभाग क्रमांक नगरसेवक राजु सोनी यांच्या नगरसेवक निधीतून हाय माक्स पथदिवे बसविण्यात आले होते. याचे उदघाटन २६-१०-२१ रोजी मा. सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
पनवेल /प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक .१९ मध्ये गुणे हॉस्पिटल, भाजी मार्केट तसेच टपाल नाका येथे काही दिवसांपूर्वी नगरसेवक राजु सोनी यांच्या नगरसेवक निधीतून हाय माक्स पथदिवे बसविण्यात आले होते. याचे उदघाटन २६-१०-२१ रोजी मा. सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. त्यावेळी डॉ.गिरीश गुणे यांच्या हस्ते उदघाटन करुन त्यांच्या हस्ते हे हाय माक्स दिवे चालू करण्यात आले.त्यावेळी येथे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे,प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, डॉ. गिरीश गुणे सर, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी, मंदार देसाई,तुषार कापरे,अरुण मालपाणी, सुनील खळदे,प्रशांत गायकवाड, सुभाष पवार ,आधी कार्यकर्ते, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी प्रितम पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.