चाईल्ड केअर संस्थे कडून आदिवासी वाडीत दिवाळी साजरी.
उरण दि 31(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यात नावाजलेली संस्था चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड चे संस्थापक- अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली माकडडोरा आदिवासी वाडीत (चिरनेर )दिवाळी साजरी करण्यात आली. आदिवासी बंधू भगिनींना अन्न धान्य किट (तांदूळ, साखर, तेल, मैदा, रवा, मीठ, मसाले, हळद, डाळ, कडधान्ये )आणी मिठाई, साड्या वाटप करण्यात आल्या. ह्या उपक्रमासाठी अविनाश घरत, दिनेश तांडेल, अरविंद तांडेल, जयप्रकाश पाटील,जितेंद्र ठाकूर,योगेश ढोपरी, सुजित तांडेल, भूषण कडू,नितीन मुकनक,माऊली समूह बचत गट भेंडखळ या मान्यवरांनी संस्थेला मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे देवेद्र पाटील (गायक ), जयप्रकाश पाटील (अध्यक्ष-नवघर ग्रामस्थ मंडळ), चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे हे उपस्थित होते. तर संस्थेकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-विकास कडू, कार्याध्यक्ष विक्रांत कडू, उपाध्यक्ष मनोज ठाकूर, उपाध्यक्ष तृषार ठाकूर, खजिनदार कु हर्षद शिंदे, सहसचिव कु.उद्धव कोळी, सदस्य कु.आदित्य पारवे, कु. ह्रितिक पाटील, कु.अभिषेक माळी हे उपस्थित होते तसेच माकडडोरा आदिवासी वाडीतील शेकडो बंधू भगिनी, लहान मुले अन्न धान्य किट घेण्यासाठी उपस्थित होते. आदिवासी बंधू भगिनी यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे आभार मानले.
तसेच मान्यवर जयप्रकाश पाटील यांनी संस्थे चे अध्यक्ष विकास कडू यांचे तोड भरून कौतुक केले. कि या युगात दिवाळी आदिवासी वाडीत साजरी करणारी उरण मधली ही पहिली संस्था आहे. देवेद्र पाटील (गायक )यांनी आदिवासी बंधू साठी आम्ही ठाकर ठाकर हे सुंदर गीत गाऊन सर्वांचे मन वेधले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विक्रांत कडू यांनी केले तसेच आभार प्रदर्शन चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे यांनी केले