गजानन उभारे यांचे दुःखद निधन.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन रामजी उभारे (वय 73) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने संपूर्ण उभारे कुटुंबियांवर व बोरी ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. ते महाराष्ट्र बँकेत नोकरीला होते.ते 13 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते.2 मुले,1 सून,1 नात, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा मृत्यू दि 2/11/2021 रोजी झाला असून दशक्रिया विधी दि 11/11/2021 रोजी उरण मधील माणकेश्वर येथे होणार आहे. तर तेरावे विधी 14/11/2021 रोजी त्यांच्या राहत्या घरी आहे. उरण नगर परिषदेचे कर्मचारी नरेंद्र उभारे यांचे ते मोठे भाऊ होते.