नगरसेवक गणेश कडू यांच्या नगरसेवक निधीतुन रस्त्यावरच्या लाईट ( विद्युत दिवे )चे काम पूर्ण.
पनवेल/प्रतिनिधी : (संतोष आमले )नगरसेवक गणेश कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्त्यावरच्या दिव्याचे उदघाटन करण्यात आले,गेली अनेक वर्ष पोदीमधील नागरिकांना रस्त्यावर अंधारातुन वावर करावा लागत होता,त्याच ठिकाणी लेडीज होस्टेल असून महिलांना सुद्धा अंधारातून जावं लागत होत. स्थानिक प्रशासनास अनेकदा पाठपुरावा करून देखील रस्त्यावर लाईट लावण्याची मागणी केली होती,पण यांस यश येत नव्हते, परंतु नगरसेवक गणेश कडू यांनी आपला नगरसेवक निधी तिथे वापरून रस्त्यावर लाईट चे पोल बसून लाईट चालू केली. गणेश कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्त्यावरच्या विद्युत दिव्याचे लोकार्पण करण्यात आले. अंधारातून प्रकाश्याकडे घेऊन जाणारा नगरसेवक अश्या शब्दात गणेश कडू यांचे कौतुक प्रकाश म्हात्रे साहेब यांनी करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या वेळी
शेकाप चे कामगार नेते प्रकाश म्हात्रे
माजी नगरसेवक सुनील मोरे,शेकाप महिला आघाडी कायकर्ती शुभांगी खरात,शेकाप व्यापारी असोशियन अध्यक्ष सुरेश खरात,शेकाप कायकर्ते राजू ठाकुर, राजेश खंडवी, श्री सिद्दी विनायक संस्थेचे अध्यक्ष संदीप घोडेकर, मार्गदर्शक (नाना) पुरुषोत्तम भुजबळ,पी 6 चे रहिवाशी थिटे साहेब, मंगलमुर्ती सोसायटीचे कदम साहेब,गणेश कडुचे जवळचे मित्र पुरुषोत्तम खानविलकर संस्थेचे सर्वं सदस्य, पदाधिकारी, पोदी ग्रामस्थ,मित्र परिवार उपस्थित होते