मनसेतर्फे उलवे शहरात दीपोत्सव.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहरतर्फे उलवे शहरात प्रथमच दिपोत्सव साजरा करण्यात आला. ज्यांच्यामुळे आपण आज दिवाळी साजरी करू शकतो त्या श्री.छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन नागरिकांनी दिवेलागण करून दिवाळी साजरी केली. यावेळी देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांना मनसे उलवे शहराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मनसे शहराध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस अनिकेत ठाकुर, सचिव मनोज कोळी, वहाळ पंचायत समिती अध्यक्ष कु.कल्पेश कोळी, गव्हाण विभाग उपाध्यक्ष कु.प्रितम तांडेल, प्रहारचे उलवे अध्यक्ष हितेश शिंगारे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, सेक्टर २० चा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश साळुंखे आणि त्यांचे पदाधिकारी, उलवे पंचक्रोशीचे मनसे पदाधिकारी विशाल भोईर, कु.चिराग कोळी, सदानंद पाटील, संदिप म्हात्रे आणि उलवे शहरातील नागरिक उपस्थित होते.