श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ व फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ यांच्या माध्यमातून कोप्रोली आदिवासी वाडीवर दिवाळी पहाट साजरी.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ व फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ यांच्या माध्यमातून उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आदिवासी वाडीवर असलेल्या गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वाढलो वरील ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाडीवरील शालेय परिसरात पणत्या लावण्यात आल्या. त्यानंतर उरण तालुक्याचे युवाशाहीर कु. उमंगजी भोईर यांचा पोवाड्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमास भेंडखळ ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाचे तसेच फ्रेंड्स सामाजिक कलामंचचे सभासद उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षकवृंद, वाडीवरील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.