पत्रकार मित्र असोसिएशन व विहानग्रुपतर्फे दुर्गम भागातील बांधवांना आणि चिमुकल्यांना फराळाचे व फटाक्यांचे वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल २ वर्षांनी नागरिकांनी दिवाळी आनंदात व भयमुक्तपणे साजरी केली. कोरोनाचे संकट संपूर्णपणे अजून गेली नसली तरी महाराष्ट्र शासनाकडून अधिक सक्ती तसेच जाचक अटी नियम जाहीर केले नसल्याने यावर्षी पूर्वीसारखी दिवाळी नागरिकांनी साजरी केली. अनेक ठिकाणी दिवाळी जल्लोषात साजरी होत असली तरी पनवेलमधील काही दुर्गम भागात दिवाळी फारशी साजरी होत नाही असेच एकंदर चित्र आहे त्यातच कोरोनामुळे आलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. श्रीमंतांप्रमाणे गरिबांची देखील दिवाळी साजरी व्हावी या उद्देशाने पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार दिवाळीनिमित्त दुर्गम भागातील बांधवाना आणि चिमुकल्यांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता त्यांनी फटाके आणि फराळाचा आस्वाद घेत दिवाळी साजरी केली. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष तथा विहान ग्रुपचे मालक केवल महाडिक, पत्रकार संतोष आमले, कैलास रक्ताटे, रोहन सिनारे, समाजसेवक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.