पनवेलमधील सर्वात जुने आणि लोकप्रिय वृत्तपत्र कोकण संध्या : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल / प्रतिनिधी : गेली १४ वर्षे पनवेल परिसरातून अखंडितपणे प्रसिद्ध होणारे साप्ताहिक कोकण संध्या हे सर्वात जुने व लोकप्रिय वृत्तपत्र आहे असे उदगार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी कोकण संध्याच्या १५ व्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. वाचकांच्या पसंतीस उतरणारे तसेच पनवेल परिसरातील डॅशिंग बातम्या प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र म्हणून कोकण संध्या वृत्तपत्र लोकांमध्ये प्रसिद्ध आहे तर त्याचे संपादक दिपक महाडिक व मुख्य संपादक केवल महाडिक हे देखील तितकेच डॅशिंग असून आजही त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे व निर्भीडपणे बातम्या करणारे पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी कोकण संध्याच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मदन कोळी, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, पनवेल टाइम्सचे संपादक ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर, आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सुप्रसिद्ध निवेदक गायक प्रवीण मोहकर, महाराष्ट्र नाईनचे संपादक रवींद्र गायकवाड, क्षितिजपर्वचे संपादक सनीप कलोते, रसायनी टाईम्सचे संपादक अनिल भोळे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे,आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, पत्रकार दीपक घोसाळकर, पत्रकार राज भंडारी, लोकमतचे प्रतिनिधी मयूर तांबडे, महाराष्ट्र 18 च्या प्रतिनिधी दिपाली पारसकर, विशाल सावंत, सुमेधा लिम्हण,अनिल राय, असीम शेख यांच्यासह पत्रकार बंधू – भगिनी, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते.