कामगारांच्या मागण्या संदर्भात मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना निवेदन.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )
जे एन पी टी च्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी उरणमध्ये आलेले केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जे एन पी टी जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट घेऊन जे एन पी टी मध्ये काम करणारे कायम स्वरूपी व कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करून त्या मागण्या पूर्ण करण्यात यावेत यासाठी भारतीय मजदूर संघांचे राष्ट्रीय सचिव तथा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील,राष्ट्रीय खजिनदार सुधीर घरत, उपाध्यक्ष मधुशेठ पाटील आदी जे एन पी टी जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सोनोवाल यांना निवेदन दिले.जे एन पी टी बंदर मधील कामगारांना जे एन पी टी मध्येच ठेवण्यात यावेत. त्याची इतरत्र बदली करू नये, नोकरीवर असताना ज्या आरोग्य सुविधा (मेडिकल फॅसीलिटी )मिळतात त्या निवृत्ती नंतरही आरोग्य सुविधा मिळाव्यात. केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त दिल्ली यांनी घोषित केल्याप्रमाणे प्रत्येकाला किमान पगार मिळाला पाहिजे. एका वर्षासाठी बोनस 8.33% नुसार मिळावे. एका वर्षाची मेडिकल लिव्ह 30 दिवसांची मिळावी आदी मागण्या या निवेदना द्वारे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना जे एन पी टी जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी सुरेश पाटील,सुधीर घरत,मधुशेठ पाटील यांनी केले आहे.यावेळी जे एन पी टी चे माजी विश्वस्त रवी पाटील,आमदार महेश बालदी, भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.