खार बंदिस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
उरण पूर्व विभागातील आवरे गावातील शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे दांगोटी खारबंदीस्ती.दरवर्षी आवरे गावातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न नेहमी दुर्लक्षित राहिला आहे म्हणून आवरे गावातील शेतकऱ्यांना दांगोटी खारबंदीस्थीसाठी निधी मिळावा आणि हा प्रश्न निकाली निघावा म्हणून उरण विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार महेश बालदी यांना निवेदन देण्यात आले.आवरे गावाच्या आग्नेय दिशेला दांगोटी खाडी असून जवळ जवळ 55 एकर एकर क्षेत्र खाडिलगत आहे. या क्षेत्रातील मुख्य पीक भात हेच आहे. परंतु खाडीच्या बांधाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने समुद्राच्या पाण्यामुळे जमीन नापीक झाली. त्यामुळे शेतामध्ये मंग्रोज ची (खारफुटी झाडांची )वाढ झाली. त्यामुळे खारलँड योजने अंतर्गत बांध बंधिस्तीसाठी निधी मिळाल्यास शेती पिकू शकते. शेती पिकल्यास बऱ्याच शेतकऱ्यांचा उदर निर्वाहाचा प्रश्न सुटू शकतो असे मुकुंद गावंड यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदारांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टीच्या उरण महिला तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ गावंड,उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारे मुकुंद गावंड,सरचिटणीस भाजपा उरण तालुका निर्मला घरत,माजी सरपंच वशेणी विजय म्हात्रे,पिरकोन गावातील जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर गावंड,आवरे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हात्रे,केशव म्हात्रे,प्रविण भगत उपस्थित होते.