एस. एस. सी. बॅच १९९२-९३ च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन.
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )जुन्या मित्र-मैत्रिनींच्या आठवणींना उजाळा मिळावा, बालपणातले, शाळेतले दिवस प्रत्येकाच्या आठवणीत राहावे, तसेच मैत्री वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन व भागशाळा खोपटे एसएससी बॅच सन 1992-93 च्या बॅच मधील शाळेत शिकणारे सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येत दुसरे वार्षिक स्नेह संमेलन रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम मित्र-मैत्रिणींचे स्वागत आणि अल्पोपाहार करण्यात आले.प्रतिमेचे पूजन स्कुल कमिटी चेरमन जीवन गावंड, हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका बल्लाळ मॅडम, पिरकोन गावचे सरपंच रमाकांत जोशी
यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी त्रैलोक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नित्यानंद म्हात्रे यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले,शिक्षक एल एन भगत ,गाढे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.त्यानंतर त्रैलोक्य प्रतिष्ठानची अधिकृत घोषणा, प्रतिष्ठान चे उद्दिष्ट सभासदांना, उपस्थितांना पटवून देण्यात आले. त्रेलोक्य प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण ऍडव्होकेट विक्रांत घरत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तदनंतर ऍडव्होकेट विक्रांत घरत यांनी उपस्थितांना उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अष्टविनायक कलामंच प्रस्तुत संगीत रजनी हा संगीतमय कार्यक्रम संस्थेचे विश्वस्थ गणेशप्रसाद गावंड व त्यांचे सहकारी यांनी सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्नेहसंमेलनात शेवटी सर्व मित्रांनी गप्पा मारल्या. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्व मित्रांनी एकमेकांची विचारपूस केली. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव शिवहरी गावंड व उपाध्यक्ष विनोद डाकी यांनी केले.