महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते रुपालीताई शिंदे संपादित पनवेल वार्ता दिवाळी अंकाचे प्रकाशन
पनवेल / प्रतिनिधी : पनवेलमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांच्या न्याय हक्कांसाठी वेळोवेळी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. रुपालीताई शिंदे संपादित पनवेल वार्ता दिवाळी अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते मंत्रालय येथे करण्यात आले महिलांसाठी विशेष प्रकाशित केलेल्या पनवेल वार्ता दिवाळी अंकाचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी कौतुक करून रुपालीताई शिंदे यांचे कौतुक केले. यावेळी पनवेल वार्ता संपादिका रुपालीताई शिंदे, रत्नमाला पाबरेकर, पूजा मोहन, स्नेहा धुमाळ आदी उपस्थित होते.