मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी सुकलेले पाम चे झाड आणि विद्युत वहिनी वर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची कटाई करून घेतली.
पनवेल/प्रतिनिधी :प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच तत्पर असतात.स्वतः जातीने हजर राहून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील याकडे यांचा जास्त कल असतो.नागरिकांना समाधान मिळावं हाच त्यांचा ध्यास आहे.*माझा प्रभाग माझी जवाबदारी* या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सुकलेले पाम चे झाडं आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडून घेतल्या व त्वरित कापलेलं झाड आणि फांद्या उचलून घेण्यास सांगितले.त्यासाठी रीतसर महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पत्र व्यवहार करून काम करून घेण्यात आले.