वृद्ध दांपत्याची फसवणूक प्रकरणी भूपेंद्र घरत यांच्यावर गुन्हा दाखल.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
दत्ताराम महादेव घरत वय 87 वर्षे हे सध्या उदयांनचल निवास, सुभासनगर चेंबूर मुंबई येथे राहत असून ते मूळचे नागाव वारीक आळी घर नंबर 57 उरण तालुका येथील रहिवासी असून 2014 मध्ये दत्ताराम महादेव घरत यांनी घर नंबर 57,वारीक काळी, नागाव,तालुका उरण जिल्हा रायगड येथे राहत असताना त्या परिसरात राहणारे नागरिक भूपेंद्र मोतीराम घरत हे जमीन विकास असून भूपेंद्र घरत यांनी दत्ताराम घरत यांच्या मालकीची मौजे नागाव सर्वे नंबर 2 मध्ये हिस्सा नंबर 1/B क्षेत्र-0.070.6 हे R आकार रुपये 1044 पैसे, ब/7 क्षेत्र 0.03.04 हेक्टर R आकार 6.00 पैसे असा हिस्सा ही मिळकत भूपेंद्र मोतीराम घरत यांनी परिसरातील कै मनोहर केणी, रा. नागाव यांच्यामार्फत वरील मिळकत विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला त्याप्रमाणे त्यांनी मिळकतीचा विकास करण्याचा बदल्यात दत्ताराम घरत यांना मोबदला म्हणून रक्कम रुपये 15,60,000 (अक्षरी -पंधरा लाख साठ हजार रुपये )तसेच सदर मिळकतीमध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारती मध्ये 600 चौ. फूट ची एक सदनिका (फ्लॅट )देण्याचे ठरले होते. त्यानुसार भूपेंद्र मोतीराम घरत यांनी वकील प्रदीप नारायण पाटील यांच्याकडे सदर मिळकत विकास करारनामा 6/2/2014 रोजी नोटरी केला. सदर करारनामा भूपेंद्र घरत यांनी स्वतः तयार करून घेऊन दत्ताराम घरत यांच्या घरी येऊन माझ्यावर विश्वास नाही का असे बोलत कागदपत्रे वाचून न दाखविता गडबडीत सही करून घेतले. मात्र करार नाम्यात ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा मोबदला भूपेंद्र घरत यांनी दत्ताराम महादेव घरत यांना दिला नाही. खरेदी खतावर सही करतेवेळी दत्ताराम घरत यांना भूपेंद्र घरत यांनी 5,60,000 रुपये दिले.मात्र भूपेंद्र घरत यांच्याकडून दत्ताराम घरत यांना उर्वरित 10,000,00 रुपये (अक्षरी दहा लाख रुपये )व 600 चौ फूट सदनिका (फ्लॅट )मिळाली नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे समजले. वारंवार फेऱ्या मारूनही, विनंती करूनही उर्वरित रक्कम व सदनिका मिळत नसल्याने दत्ताराम महादेव घरत यांनी विकासक भूपेंद्र मोतीराम घरत यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहिता 1860 अन्वये 423,420,504 कलमा अंतर्गत भूपेंद्र घरत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी सचिन दत्ताराम पाटील हे करीत आहेत.याबाबतीत भूपेंद्र घरत यांना विचारले असता त्यांनी संबंधित व्यवहाराचे सर्व पैसे दिले असल्याचे सांगितले. तसेच आता या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सर्व व्यवहार स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने झाला आहे. यात मी कोणाचेही फसवणूक केलेली नाही असे स्पष्टीकरण भूपेंद्र घरत यांनी दिले तर उरण पोलीस ठाण्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे समजते.