उलवे परिसरात प्राण्याचा क्रूर छळ थांबविण्याची मनसेची मागणी.
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )दिनांक 7/11/2021 रोजी उलवे शहरात बामण डोंगरी रेल्वे स्टेशन येथे सुमारे रात्री 3 ते सकाळी 7 च्या दरम्यान एक जखमी अवस्थेत श्वान(कुत्रा )आढळून आला तेंव्हा तेथे उपस्थित दक्ष नागरिक सीमा टांक यांनी त्वरित त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार केले. बाई साकराबाई पेटीट हॉस्पिटल परेल येथे दाखल करून प्रथमोपचार केले.सदर प्रकरणामध्ये सीमा टांक यांनी खारघर मनसे शाखाध्यक्ष आदर्श कांबळे यांच्याशी संपर्क केला. आणि आदर्श कांबळे यांनी सदर तक्रार उलवे शहर जनसंपर्क कार्यालय येथे मनसे पंचायत अध्यक्ष कल्पेश भरत कोळी यांच्याशी संपर्क साधून सदर तक्रार बद्दल शहानिशा करून घेतली. सदर घटनेचा अंदाज घेऊन हे कृत्य नशेच्या अधीन रेल्वे स्टेशन आणि पुलाखालील परिसरात असणारे इसम यांनी( गांजा ड्रुग्सच्या )अमली पदार्थांचे सेवन करून कृत्य केला असल्याचा संशय आहे.तरी सदर परिसरात झालेली घटना परत होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई आणि तपास करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील-एन.आर.आय.पोलीस ठाणे बेलापूर यांना मनसे पंचायत समिती अध्यक्ष कल्पेश भरत कोळी यांनी केली आहे.