आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अपघातग्रस्त दिपक महादेव पाटील यांना धनादेश सुपूर्द.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )काही दिवसापूर्वी नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्राव्हेट लिमिटेड वेअर हाऊस मधे फोअरक्लीप च्या धक्याने भिंत कोसळून ती हातावर पडून अपघातग्रस्त दिपक महादेव पाटील यांचा डावा हात निकामी झाला.घटनास्थळी भाजपा तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड़,उरण पुर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, वशेणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय म्हात्रे,उद्योजक देवेंद्र पाटील खोपटे,नामदेव पाटील वशेणी आदी जाऊन कंपनी मालक विशाल गोयल,व्यवस्थापक इम्प्तीयाज़ शैख शरिफ यांची भेट घेतली.आमदार महेश बालदी यांनी दुरध्वनी मार्फत चर्चा करुन आणी वरिल व्यक्तीशी प्रत्यक्ष चर्चा केली.आमदार महेश बालदी आणि भाजपचे पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कंपनी मालकाने सहकार्य करण्याचे मान्य करुन आज 600000/-(अक्षरी सहा लाख रुपये )रक्क्मेचा धनादेश आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अपघात ग्रस्त दिपक पाटील यांना देण्यात आले.
अपघात झाल्यामुळे उपचाराचा सर्व खर्च कंपनी देईल तसेच येणारा मेडिक्लेमची रक्कम दिपक यांनाच देण्यात येईल तसेच त्याला कामावर घेऊन त्याला पगार चालूच राहिल याची ग्वाही देण्यात आली.यावेळी भाजपा उरण शहर प्रमुख कौशिक शहा,उरण नगरसेवक राजु ठाकुर,मनोहर सहतिया उपस्थीत होते. आमदार महेश बालदी,भाजपा उरण पुर्व विभाग कमिटी व दिपक महादेव गावंड यांच्या परिवाराकडून कंपनी मालक यांचे आभार मानण्यात आले.