सारडे गावात विविध विकास कामांचे भूमीपूजन व उदघाटन सोहळा संपन्न.
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )
२४ नोव्हेंबर २०२१ रोजी सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने सारडे गावातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ शेकाप रायगड जिल्हा चिटणीस व पक्ष प्रतोद अँड.आस्वादशेठ पाटील, उरण पंचायत सभापती समिधाताई म्हात्रे,पक्ष प्रतोद व राजिप सदस्य बाजीराव परदेशी ,उपसभापती शुभांगीताई पाटील,माजी सभापती सागर कडु यांच्या शुभहस्ते तर माजी राजिप सदस्य जीवन गावंड,माजी पंचायत सदस्य रमाकांत पाटील ,शेकाप युवा नेते निलेश म्हात्रे,शिवसेना कार्यकर्ते मनोज पाटील यांच्या उपस्थितीत पि.डब्ल्यू.डी. रस्ता ते सारडे तलाव पर्यंतचा रस्ता,राजिप शाळा सारडे येथील संरक्षण भींतीच्या कामाचे भूमीपूजन श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
तसेच रा.जि.प.शाळेच्या सभागृहाचे उद्घाटन आस्वादशेठ पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापुन व श्रीफळ वाढवुन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत सारडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रशेखर पाटील ,उपसरपंच समीर पाटील,माजी उपसरपंच श्यामकांत पाटील,भारती संकेत पाटील,अपेक्षा संदेश पाटील,ग्रा.सदस्या भगवती अविनाश पाटील ,ग्रा.सदस्य भार्गव म्हात्रे,ग्रामसेविका संचिता केणी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.प्रास्तविक करतांना सरपंचांनी गेल्या चार वर्षात ग्रामपंचायतीच्या मार्फत सारडे गावासाठी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मान्यवरांच्या समोर मांडण्यात आला. यावेळी गावातील दिव्यांगाना ५%ग्रामनीधीतुन धनादेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक ध.प.पाटील गुरुजी ,छ.ल.पाटील गुरुजी,जो.ल.पाटील गुरुजी,ए.डी.पाटील ,एच.के.पाटील,अँडव्होकेट हिरामण पाटील,पोलीस पाटील घनःश्याम पाटील ,कृषी अधिकारी देशमुख ,महिला बचत गटातील महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी रोहन पाटील यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थितांचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता केली.