उरण तालुक्यामधे काँग्रेस पक्ष १ नंबरचा पक्ष करणार असल्याचा युवक काँग्रेसचा भेंडखळ गावामधे एल्गार.
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील भेंड़खळ येथे युवक काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सहकारी व युवकांशी संवाद साधला.संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “With IYC” ह्या Mobile App वरुन Online Voting कसे करायचं हे युवक कार्यकर्ते व युवकांना समजावून सांगण्यात आले. युवक काँग्रेसच्या निवडणूकीच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेत चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वजण आपापल्या परीने योगदान देत आहेत.निवडणूकीमुळे संघटनेत खुप सारे नवीन युवक पक्षाच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होताना दिसत आहे.असे पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.उरण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष बनविणार असल्याचा निर्धार युवकांनी यावेळी केला.यावेळी रायगड जिल्हा सरचिटनिस राम भगत ,रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा संध्याताई ठाकूर, उरण तालुक़ा खजिनदार नरेश म्हात्रे , ग्रामपंचायत भेंडखल उपसरपंच लक्ष्मण ठाकुर,उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत ,उरण तालुक़ा युवक काँग्रेस उपाध्यक्ष लंकेश ठाकुर , नवघर जिल्हा परिषद अध्यक्ष यशवंत म्हात्रे , जेष्ठ कार्यकर्ते रमेंश ठाकुर ,महेश ठाकुर,दीपक ठाकुर,अजित ठाकुर,रविंद्र पाटील,किरण पाटील,दीपक भोईर,प्रांजल भोईर, साई पाटील, सचिन भोईर,अमित पाटील,आदित्य घरत,मयुरेश घरत,वैभव ठाकुर, निखिल ठाकुर,प्रणय ठाकुर, राहुल ठाकुर,रोहन ठाकुर , प्रदन्यान म्हात्रे,अमोल ठाकुर,जयेन ठाकुर,सतीश पाटील,सत्यवान ठाकुर,जयेश भगत,ध्रुवा ठाकुर, गणेश म्हात्रे,राजु डांगे,गणेश गावंड आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.