मराठी शाळेजवळ आढळला मृतदेह
पनवेल, दि.26 (संजय कदम) ः पडगाव येथील मराठी शाळेजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 72 वर्षे, उंची 5 फूट, रंगाने गहुवर्णीय, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, बसके, डोक्याचे केस काळे-पांढरे असून अंगात काळ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक एन.बी.कोंडे यांच्याशी संपर्क साधावा.