मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
उरण 26(विठ्ठल ममताबादे )शंकरा आय हाॅस्पीस्टल नवीन पनवेल आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळ याच्या संयुक्त विद्यमानाने
रविवार दि.12 डिसेंबर 2021 रोजी रा. जि .प शाळा वशेणी,वरचे आळी उरण तालुका येथे सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 पर्यत मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचा लाभ घेणाऱ्यांनी काही सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे त्यात
1)वशेणी सोडून बाहेर गावच्या गरजूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करा.
2)नागरिकांनी शिबिरात येताना सोबत रेशन कार्ड व आधारकार्ड झेरॉक्स आणावी.तसेच मधुमेहाची औषधे चालू असल्यास ती देखील सोबत आणावी
3) अजूनही कोविड काळ आहे तेव्हा मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंन्सचा वापर करावा.
4)तपासणी साठी अगोदर नोंदणी केलेल्या रूग्णांसाठी तसेच मंडळाच्या विशेष व्यक्तींसाठी अगोदर प्राधान्य देण्यात येईल.
5)रांगेचा त्रास वाचवणे व वेळेची बचत होण्यासाठी सर्वानी 9/12/2021 संध्याकाळी 5:00 पर्यत मंडळातील सदस्यांकडे नोंदणी करावी.
6)जरी नोंदणी केली नाही तरी ऐनवेळेस नंबर दिला जाईल.
7)ऑपरेशन साठी लाभार्थी पेशंटला त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल.अशा रुग्णांची मोफत राहण्याची, जेवणाची सोय करण्यात येईल. शिबिराचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक
1) मच्छिंद्रनाथ म्हात्रे – 9819652951
2) संदेश गावंड 9657865884
3) आदिनाथ पाटील 9920144527
4)सतिश पाटील 9920724457
5)किशोर म्हात्रे 7768947578
6)डाॅक्टर रविंद्र गावंड 9869141469