पनवेलमधील समाजसेवक व धडाडीचे तरुण पत्रकार मा. केवल महाडिक यांना सामाजिक कार्याबद्दल नवरत्न कॅटॅलिस्ट पुरस्काराने सन्मानित
पनवेल / प्रतिनिधी : समाजकार्यात व गोर – गरिबांच्या हाकेला सदैव धावून जाणारे तसेच अन्यायाला निर्भीडपणे वाचा फोडणारे अशी ख्याती असलेले पनवेलमधील समाजसेवक व धडाडीचे तरुण तडफदार पत्रकार मा. केवल महाडिक यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एकता कॅटॅलिस्ट संस्थेतर्फे नवरत्न कॅटॅलिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उरणमधील जे.एन.पी.टी. टाऊनशीपच्या मल्टीपर्पज हॉल येथे कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. दिवंगत जेष्ठ कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांच्या प्रेरणास्थानावर आधारित एकता कॅटॅलिस्ट संस्थेने यावेळी भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एकता कॅटॅलिस्टच्या माध्यमातून वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवरत्नाचा सन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात येते. पनवेलमधील समाजवेसक व पत्रकार केवल महाडिक यांना पुरस्कार मिळाल्याने अनेक प्रतिष्ठित लोकांनी तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.