मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचा पदनियुक्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : मानवी हक्क संरक्षण फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन सदस्य यांना संस्थेचे नियुक्ती पत्र देण्यात आले सोबत आय कार्ड, बॅच, स्टिकर, कि- चेन आदी देण्यात आले. कार्यक्रमाला मॉडेल स्नेहल राजे निंबाळकर उपस्थित होत्या. त्यावेळी शब्बीर कोठारी, निलेश भगत, शाहीन शेख, निहालिका चव्हाण (पुणे),विजय खेडकर (खोपोली), लक्ष्मण बागाव (नवी मुंबई), संतोष कुशवाह,दीपक कुशवाह, पंकज शाह आदींना नियुक्ती पत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राज सदावर्ते यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी मानव अधिकार जन जागृती, सदस्य आचारसंहिता, कार्यपद्धती, प्रचार – प्रसार याबाबात माहिती दिली व लवकरच मानव अधिकार शिबिर आयोजित करण्याबाबत सांगितले. संपूर्ण भारतात लवकरच फेडरेशन चे सदस्य असतील अशी ग्वाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांनी दिली. दिनदर्शिका 2021 साठी प्रत्येकांनी आपली वैयतिक तथा व्यवसायाची जाहिरात देऊन सहकार्य करावे असे पत्रकार राज सदावर्ते यांनी सांगितले. त्यावेळी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नेहालिका चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.