स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित हिरवे यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित हिरवे यांनी नुकत्याच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घेतलेल्या बैठकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनी 6 डिसेंबरला मुंबई येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील स्मृतीस्थळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोने अनुयायी उपस्थित राहतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी परिसरात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले नव्हते. तरी यावेळी शासनाने अभिवादन करण्याची परवानगी द्यावी व परवानगी न दिल्यास तरी सर्वांनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन त्याांनी केले आहे. यानिमित्त उपस्थित राहणार्या लाखो आंबेडकरी अनुयायांना दरवर्षी पक्षाच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येते. तशाच प्रकारचे अन्नदान यावर्षी सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.