डॉ.मुनीर तांबोळी यांच्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांच्या हस्ते स्विकारले सन्मानपत्र
प्रतिनिधी : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष , ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, हिंदुस्तान 24 तास न्युज चे मुख्य संपादक डॉ.मुनीर तांबोळी यांनी कोरोनाच्या महाभयंकर अशा संकटात पहिल्या दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपत झोकून देऊन जनतेसाठी काम केलं आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो वा कोरोना संकट……हा माणूस सतत माणुसकीचे दर्शन घडवितो. तसेच आपली आक्रमक शैली तथा एकापेक्षा एक हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणून डॉ.मुनीर तांबोळी ओळखले जातात. त्यांच्या कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल थेट जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. डॉ.मुनीर तांबोळी यांच्या त्याच कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने तांबोळी यांचा गौरव करत त्यांचा *वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन* मध्ये समावेश केला आहे. तांबोळी यांनी कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीतून व प्रामाणिक भावनेतून मानवी सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनेच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.
याबाबत डॉ.मुनीर तांबोळी म्हणाले, कोरोना संकटात लोकांना मदत करणे ही एक संधी समजलो. या संधीचं सोनं करताना फक्त नागरिकांना जे हवं आहे. त्याप्रमाणे काम करत गेलो. कोरोना संकटात लोकांच्या गरजा ओळखल्या आणि मग त्यानुसार जीवनावश्यक वस्तू, धान्यकीट, औषधे, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात लोकांना मदत केली.कोरोनाने कोणत्याही संकटाला भिडण्याची ताकद दिली. आणि माझ्या कोरोना काळातील कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा खूप आनंद आणि समाधान आहे.लंडन येथील वर्ल्ड बूक ऑफ रेकाॅर्डने कोरोनाकाळातील माझ्या कामाची दखल घेतली, ही भावना प्रचंड सुखावणारी आहे. कोरोना काळात आम्ही धान्य वाटप, रस्त्या वरील बेघरांना जेवणाचे डबे देणे, मास्क वाटप करणे , पेशंटची ने आण करण्यासाठी अँबुलन्स उपलब्ध करून देणे, हॉस्पिटल मध्ये बेड न मिळणार्यांना बेड उपलब्ध करून देणे ही कामे केली. अधिकार्यांकडे पाठपुरावा करून गंभीर रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन मिळवून दिले.वर्ल्ड बूक ऑफ रेकाॅर्ड तर्फे मला मिळालेले प्रमाणपत्र म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद यांच्या हस्ते हा सन्मान मी स्वीकारला या सर्वांचे मी आभार मानतो.