सलग ७ वर्ष वरदचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरे.
उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांचे सुपूत्र चि. वरद याच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेत ता. उरण येथील चिरनेर परिसरालगतच्या केळ्याचा माळ चांदायले वाडीतील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर,शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप केले आणि तेथील अंगणवाडीतील मुलांना विविध खेळणी व खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे हेमल किरण मढवी हिच्या वाढदिवसानिमित्त दत्तक घेतलेल्या वाडीतील दोन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दफ्तर व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी चिरनेरचे सुप्रसिद्ध गायक मोहन फुंडेकर यांच्या सुश्राव्य गायनाने वाढदिवसाची आणखी रंगत वाढली.
वरदच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम अथवा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवून वाढदिवस साजरे करीत असल्याने त्याच्या आई वडीलांवर सर्व थरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यावेळी रायगड भुषण मनोज पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, आदिवासी नियोजन माजी अधिकारी श्रीधर मोकल, मुख्याध्यापिका प्रतिभा लहासे, अंगणवाडी सेविका रोहिणी ठाकूर, शिक्षक विजय लहासे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, काशिनाथ खारपाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे गणेश मढवी, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.