स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज पनवेल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी पनवेल तालुकाध्यक्ष नरेश परदेशी, शहराध्यक्ष अविनाश अडागळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप नाईक, शहर उपाध्यक्ष भारत दाताड, महिला आघाडी अध्यक्षा ममताज पठाण यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने मुंबई येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे जावून राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.