दुबईत अडकलेल्या मराठी नाविक बांधव मायदेशी आणण्यात यश.
पनवेल /प्रतिनिधी:दलालांनी केलेल्या फसवणुकी मुळे अडकून पडलेल्या मराठी नाविक, योगेश तांदळे वय वर्षे २३, याची बेलापुर येथील दलालाने पीओई लेटर शिवाय केवळ ९६ तासांच्या व्हिसा मुदतीवर शारजाहला पाठविले. १६ नोव्हेंबरला जहाजावर रुजू करून घेण्यात आले. तेथे योगेशचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले. वेगवेगळ्या सहा देशांतून आलेले क्र्यु मेंबर जहाजावर होते. त्यांच्याकडून प्रत्येक क्षणी त्रास दिला गेला, त्यामुळे योगेश तेथे राहण्याच्या मनस्थितीत अजीबात नव्हता. घरच्यांशी बोलून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, पण पासपोर्ट आणि अन्य कागदपत्र दलालाकडे अडकल्याने परतीचा मार्ग बंद असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे घरचे लोक खूप तणावात होते, त्यांनी ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन कडे संपर्क करून घडला प्रकार सांगितला. नौवहन मंत्रालय आणि दुतावसाशी यूनियन मार्फत तातडीने यासंबंधी माहिती देवून, योग्यती सूत्र हलवण्यात आली. केवळ तिकीट आणि आपत्कालीन व्हिसाचे पैसे वगळता एकही रुपया त्याच्याकडून घेण्यात आला नाही, अशी माहिती ऑल इंडिया सिफेरर्स यूनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी दिली.