नगरसेवक गणेश कडू यांचा पत्रकारांनी केला सत्कार
पनवेल /प्रतिनिधी :पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर नगरसेवक व शेकापक्षाचे पनवेल महानगरपालिका शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट समाजसेवेबद्दल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश कडू हे सिद्धीविनायक सोशल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष तसेच एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन रायगड भुषण मार्गदर्शक मा.श्रीण संस्था आंतरराष्ट्रीय एनजीओ, दिल्लीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पनवेलमधील पत्रकारांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रायगड शिव सम्राटचे संपादक तथा पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, पनवेल वार्ता वेब चॅनेलच्या संपादिका रुपाली शिंदे, रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे, रायगड प्रभातचे संपादक विजय पवार, रायगड टाइम्सचे प्रतिनिधी आनंद पवार, क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते,पत्रकार सचिन वायदंडे ,आसीम शेख आदी उपस्थित होते.