आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षण उत्साहात संपन्न.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे ) ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे वतीने मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर या संस्थेत चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी बाबतचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यावेळी रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी 15 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष आपत्ती व्यवस्थापण प्रशिक्षण पूर्ण केले.
रायगड जिल्ह्याने मागील काही वर्षात निसर्ग, तौक्ते अशा प्रकारची विविध वादळे व अतिवृष्टी, दरड कोसळणे यासारखी नैसर्गिक संकटे अनुभवली आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी अंतर्गत प्रशिक्षणाची असलेली गरज ओळखून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महसूल, पोलीस, ग्राम विकास विभागाच्या 50 अधिकारी/कर्मचाऱ्यांना दि. 15 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्वर, ओरिसा येथे “चक्रीवादळ सौम्यीकरण व पूर्वतयारी” या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी पाठविले होते.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महसूल विभाग- 7, पोलीस विभाग- 10 पोलीस अधिकारी व 10 पोलीस कर्मचारी, 15 होमगार्डस् , श्रीवर्धन सरपंच 1, घारापुरी उरण सरपंच 1, ग्रामविकास विभाग-6 असे एकूण 50 अधिकारी-कर्मचारी व इतर सहभागी झाले . यानंतरही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. कल्याणकर व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 50-50 च्या दोन पथकांना येणाऱ्या पुढील कालावधीत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा, आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचा समावेश केला जाणार आहे.
कोट (चौकट ):-जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड तथा जिल्हा व्यवस्थापन विभाग अंतर्गत भुवनेश्वर ओडीसा येथे आयोजित तीन दिवसिय शिबिराची दिनांक 15/12/2021 ते 17/12/2021 पर्यंत आयोजित केलेल्या शिबिराची तिसऱ्या दिवसी सांगता करण्यात आली.
सन 1999 साली झालेल्या जिवघेण्या तुफानानंतर ओडीसा सरकारने Disaster Management व्दारे कसे नियोजन करण्यात येते.याचे प्रशिक्षण तसेच Mop Drill व्दारे कृती तुन दाखविण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन बाबतीत ओडीसा सरकार कसे सतर्क असते याबाबत इंतभूत माहिती दिली.शेवटच्या सत्रात सरपंच म्हणून मला बोलण्याची संधी दिली.यावेळी तीन दिवसांत आपण काय शिकलो याविषयी सर्वांना संबोधित केले.तसेच ओडीसा सरकारने आमची ज्या पध्दतीने काळजी घेतली त्यासाठी ओडीसा सरकारचे आभार.त्याचप्रमाणे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन शिबिरासाठी मला संधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
– बळीराम ठाकूर
सरपंच घारापुरी ग्रामपंचायत, उरण तालुका