डॉ. मुनीर तांबोळी यांची इंडियन प्रेस क्लबच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड
पनवेल /प्रतिनिधी : इंडियन प्रेस क्लबच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी डॉ.मुनीर तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून ही नियुक्ती
राष्ट्रीय अध्यक्ष विवेक पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष हाजी अब्दुल शेख, राष्ट्रीय सरचिटणीस विकास कुलकर्णी यांच्या सहमतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहाजहान आत्तार यांनी केली आहे. गुणवत्ता व कार्यक्षमता पाहून डॉ.मुनीर तांबोळी यांची नियुक्ती केली असून कायदे व नियमांचे सदैव पालन करून संघटनेच्या उद्देशानुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.मुनीर तांबोळी यांनी आत्ता पर्यंत अनेक सामाजिक विषय सोडवलेत,मानवी हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे.अनेक दैनिक साप्ताहिक वृत्तपत्रात
उपसंपादक,कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे.सध्या ते हिंदुस्तान 24 तासचे मुख्य संपादक आहेत.इंडियन प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणार तसेच संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.त्यांच्या निवडी बाबत अनेक सामाजिक संघटना व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.