महाड औद्योगिक वसाहतीत मनसे च्या युनियनची तोफ धडाडली
पनवेल/रायगड : शीतल किरण पाटील
एम आय डी सी मधिल लोना इंडस्टिज डिमिडेड कंपनी मध्ये झेंडा लावत केला महाड औद्योगिक क्षेत्रात जोरदार प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युनियन . अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या हस्ते झाले लोना इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गेट समोरील फलकाचे अनावरण
महाड एम आय डी सी येवढी मोठी असताना आणि मोठ मोठे राजकीय नेते असताना कामगारांना न्याय मिळत नाही हे दुर्देव मनसे यूनियन अध्यक्ष मनोज चव्हाण
महाड एम आय डि सी परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने कार्यरत असून बहुतांशी कारखान्यात वेग वेगळ्या कामगार संघटनांच्या युनियनची स्थापना झाली आहे बहुतांशी कारखान्यात शिवसेना प्रनित भारतीय कामगार सेना युनियनची स्थापना झाली असून त्या पाठोपाठ कामगार उत्कर्ष सभा ही युनियन कार्यरत आहे मात्र आज महाड एम आय डी सी मध्ये आणखीन एका बलाढ्य युनियनने महाड एम आय डी सी मध्ये आगमण केले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या युनियनचे महाड एम आय डी सी मध्ये आगमन झाले असून एम आय डी सी मधिल लोना इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या युनियनची स्थापना केली असून आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या उपस्थित कंपनीच्या गेट समोर श्रीफळ वाढवून युनियनची स्थापना केली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष संदीप धुरी, उपाध्यक्ष प्रकाश पवार , मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष चेतन उत्तेकर, मनसे तालुकाध्यक्ष संपोष पार्टे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर लोना इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोळत असताना मनोज चव्हाण यांनी महाड एम आय डि सी मध्ये चांगले चांगले मंत्री आणि लोक प्रतिनिधी असताना आणि मोठी एम आय डी सी असताना देखिल या ठिकाणी कामगारांना न्याय मिळत नाही, या ठिकाणी कारखानदार कामगार कायदे धाब्यावर मारून कामगारांनकडून काम करून घेत आहेत मात्र आता आम्ही या टिकाणी आमची इंट्री झाली आहे आता आम्ही दाखवून देऊ कामगार कायदे काय आसतात आणी यापुढे कामगारांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उभी राहिल अशी ग्वाही दिली आहे