अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ‘ त्या ‘ आरोपीला कठोर शिक्षा करावी राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची मागणी. खोपोली : मागील आठवड्यात पटेल नगर नॅशनल गॅरेज शिळफाटा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस खोलीच्या शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी केली आहे. खोपोलीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी महिला काँग्रेस खोपोली शहर अध्यक्षा सौ. सुवर्णा मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश केळसेकर यांची भेट घेऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांनी केले.