पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्ष पदी चौथ्यानंदा निलेश सोनावणे ,कार्याध्यक्षपदी संतोष भगत, सचिवपदी रवींद्र गायकवाड तर उपाध्यक्षपदी आनंद पवार व गणपत वारगडा
पनवेल /रायगड :
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सल्लागार दीपक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या सभेत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यानंदा निलेश सोनावणे यांची एकमताने निवड करण्यात आली .
आज झालेल्या सभेत कार्याध्यक्षपदी रायगड पनवेल चे संपादक संतोष भगत ,उपाधयक्षपदी रायगड टाइम्स चे प्रतिनिधी आनंद पवार , आदिवासी सम्राट चे संपादक गणपत वारगडा,सचिव पदी लाईव्ह महाराष्ट्र 09 चे संपादक रवींद्र गायकवाड ,खजिनदार पदी माझं पनवेल चे संपादक विशाल सावंत ,प्रसिद्धी प्रमुख पदी वार्तांकन चे संपादक संतोष सुतार यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली . यावेळी पत्रकार श्री.संतोष आमले आदी जण उपस्थित होते .
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकारांना भेडसावणारे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय हक्कासाठी समिती लढत आहे . पेन्शन योजना ,घरकुल योजना , अयोग्य विमा योजना याकरिता समिती शासनाकडे पाठपुरावा करीत असून आगामी काळात पत्रकारांना ज्या ज्या समस्या भेडसावत आहेत त्यावर आवाज उठून न्याय हक्कासाठी सनदशील मार्गाने काम करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी यावेळी सांगितले .
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्ष पदी चौथ्यानंदा निलेश सोनावणे ,कार्याध्यक्षपदी संतोष भगत, सचिवपदी रवींद्र गायकवाड तर उपाध्यक्षपदी आनंद पवार व गणपत वारगडा
-
Previous
मोहोपाडा येथील विनोद शर्मा रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा ,किमती मोबाईल केला परत पनवेल /रायगड : मोहोपाडा येथील स्वराज माळी हा अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून त्याचा किमती मोबाईल सोमवारी दुपारच्या सुमारास रिक्षाने प्रवास करीत असताना हरविला.स्वराज लोधिवली येथून मोहोपाडा करीता रिक्षामध्ये प्रवास करीत असताना त्याचा पंचवीस हजार रुपये किंमतीचा व्हिओ कंपनीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला.हा मोबाईल विनोद शर्मां यांना रिक्षात सापडल्याने त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून रिक्षा चालक विनोद शर्मा याने स्वराज माळी यांचा शोध घेतला. व त्याला मोहोपाडा रिक्षा थांब्याजवळ बोलवून रिक्षा चालक मालक संघटनेच्या थांब्याजवळ सुपूर्द केला.यासाठी रिक्षाचालकांनी मोबाईल स्वराज माळी यास सापडण्यासाठी मदत केली.संघटनेच्यावतीने विनोद शर्मा यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन त्याचा सत्कार करण्यात आला. रिक्षाचालक विनोद शर्मा यांचे संघटनेचे सल्लागार फुलचंद लोंढे यांनी कौतुक केले.