शिवसंग्राम तर्फे मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल/रायगड
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतभर 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असणारी मुंबई येथे,आमदार विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून मोठ्या थाटामाटात शिवजयंती मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शोभायात्रा काढून. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत चा इतिहास नाट्य स्वरूपात दाखवण्यात आला. यावेळी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी व मान्यवरांनी महाराजांना अभिवादन केले मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात आली, संघटनेचे अध्यक्ष माननीय आमदार विनायक मेटे साहेब संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा कार्यक्रम पार पडला अशी माहिती शिवसंग्राम युवक आघाडीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री अमर राजे वामन यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.