परदेशातुन आलेल्या मालाचा अपहार करणार्या टोळीस पनवेल शहर पोलीसांकडुन अटक
पनवेल, दि.23 (संजय कदम) ः परदेशातून आलेल्या मालाचा अपहार करणार्या टोळीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात परदेशी मालाच्या अपहार प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रारदार विश्वनाथ दत्तात्रय पाटील, वय 50 वर्षे, रा. चिंचवड, पुणे यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या एल्काय कंपनीने चीन या देशातून मागविलेले आरएस-602 या नावाच्या केमिकलचे 44 बॅरल व एचएमएस-240 बी या नावाच्या केमिकलचे 80 बॅरल हे एलसीएल लॉजिस्टीक इंडिया प्रा.लि. शिरढोण, ता. पनवेल या कंपनीच्या गोडाउनमध्ये ठेवले होते. यातील गोडाऊनचे मॅनेजर- आरोपी भरत उंडे (35रा. कळंबोली, पनवेल) व इतर एक आरोपी यांनी आपसात संगणमत करुन स्वत: च्या आर्थिक फायद्याकरिता फिर्यादीचा विश्वासघात करुन वरील बॅरेल परस्पर भिवंडी येथे विक्री केली व फिर्यादीच्या बॅरल मध्ये पाणी भरुन एल्काय कंपनीची रुपये 1,13,37,419/- ची फसवणुक करुन विश्वासघात केला म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासामध्ये पनवेल शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह तांत्रिक तसेच गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हयातील अपहार झालेला मुद्देमाल रुपये 1,13,37,419/- चे आरएस-602 या नावाच्या केमिकलचे 44 बॅरल आणि एचएमएस-240 बी या नावाच्या केमिकलचे 80 बॅरल हे भिवंडी येथील वेअर हाऊस मधुन हस्तगत करणयात आले. त्यानंतर गुन्हयातील आरोपी भरत उंडे याचा या गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह,पोलीस सह. आयुक्त जय जाधव, पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील, परिमंडळ 2, पनवेल, भागवत सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय जोशी, सपोनि. गणेश दळवी, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोना महेश पाटील, पोना परेश म्हात्रे, पोना अशोक राठोड, पोना भगवान साळुंके व पोशि संतोष मिसाळ या पथकाने केलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पनवेल शहर पोलीस ठाणेमार्फत चालु आहे.
फोटो ः अटक केलेल्या आरोपी संदर्भात माहिती देताना अधिकारी वर्ग (छाया ः संजय कदम)