कर्जत तालुक्यातील संतप्त आदिवासी संघटनांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर काढला निषेध मोर्चा
कर्जत तालुक्यातील मौजे तारवाडी येथे दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता जागेचा वाद असताना तिथे काम करणाऱ्यांना अडवायला गेलेल्या महिलांवर झालेल्या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाले होते पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक करावी तसेच आदिवासींवरील अत्याचाराच्या विरोधात ऊंनंत्ती सामाजिक संस्थेकडून पोलीस उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोदविला. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी आदिवासी बद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचाही आदिवासी संघटनेकडून जाहीर निषेध केला व आरोपीला अटक केली नाही तर येणाऱ्या दहा दिवसात महाराष्ट्रभर आदिवासी संघटना मोर्चा काढतील असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे बिगर आदिवासी कृष्णकुमार ठाकूर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकरी आदिवासी असल्याचा गैरफायदा घेऊन विवादित जागेवर काम सुरू केले. आपल्या जागेवर काम सुरू असल्याचे समजताच तुळशिबाई खांडवी व इतर आदिवासी महिला या काम थांबवायला गेल्या होत्या मात्र कृष्ण कुमार ठाकूर ,अमोल पाटील , गणेश घोडविंदे , इतर ५ यांनी आदिवासी महिलांवर जीवघेणा हल्ला केला आदिवासी महिलांवर जीवघेणा हल्ला केला त्या हल्ल्यात आदिवासी महिला पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्या होत्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल होऊन अमोल पाटील व इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र या घटनेचा मुख्य सूत्रधार कृष्णकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही तसेच गुन्हेगार आध्याप मोकाट फिरत असल्याने पोलिस खात्याकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे त्यामुळे या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढून निषेध केला . प्रशासकीय अधिकारी बदलला पाहिजे अशी मागणी केली. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक केली जात नाही गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कृष्णकुमार ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू ठेवला जाईल तसेच अत्याचार ग्रस्त पीडित महिलेला संरक्षण द्यावा यासाठी कायद्याचा आधार घेऊन अर्ज दिला गेला आहे तसेच पोलीस प्रशासनातील ज्या अधिकाऱ्याने आदिवासी महिला रानटी असल्याचे बोलले आहेत त्यांच्या विरोधात व महसूल विभागातील ज्या कर्मचारी अधिकाऱ्याने खोटे कागदपत्रे तयार केली असतील त्यांच्यावर सुद्धा अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असे फिर्यादी महिलेचे वकील ॲड. सुमित साबळे यांनी सांगितले. आजाद समाज पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष ऍड सुमित साबळे तसेच रायगड आदिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन असेलच चालू ठेवले जाईल…