केमिस्ट असोसिएशन उलवे तिसरा वर्धापन दिन सोहळा संपन्न
पनवेल, दि.1 (संजय कदम) ः केमिस्ट असोसिएशन उलवेने तिसरा वर्धापन दिन सोहळा खुपच, छान, उत्तम, नेत्रदिपक, उत्कृष्ट दर्जाचा झाला झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रविशेठ पाटील (अध्यक्ष, साई देवस्थान मंदिर, वहाळ), डॉ. विलासराव कदम (मा. नगरसेवक, डायरेक्टर ऑफ भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट नवी मुंबई), सौ. हेमलता भगत (मा. सरपंच गव्हाण ग्रामपंचायत), अॅड. सौ. प्रतिभा पाटील (कायदेशीर सल्लागार, केमिस्ट असोसिएशन उलवे), शशिकांत रासकर (मा. अध्यक्ष, नवी मुंबई केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन) वरील उपस्थित मान्यवरांनी उपस्थित राहून केमिस्ट असोसिएशन उलवे च्या वर्धापन दिन सोहळ्याची शान द्विगुणित केली. उलवेतील औषध क्षेत्रात विशेष कार्य करणार्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार आणि सन्मान पुरस्कार समारंभ याप्रसंगी उपस्थित राहून सर्वानी कार्यक्रमास एक नवी उभारी प्राप्त झाली तसेच सोबत बहारदार कार्यक्रम आणि स्नेह भोजन कार्यक्रम उत्कृष्ट होता. सूत्रसंचानाची जबाबदारी पार पाडणारे असोसिएशनचे खजिनदार रितेश वाघमारे आणि सौ.आरती शर्मा यांनी खूप छान पार पाडली. औक्षणाची जबाबदारी सौ. शर्मिला ठाकूर, सौ. प्रियांका वाला, सौ. संगीता रौनीयर, सौ. धनश्री शिंदे, सौ. छाया भास्कर उत्कृष्टरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे नियोजन सौ. किरण गोविंद जाधव (उपाध्यक्षा, केमिस्ट असोसिएशन उलवे), गोविंद जाधव, तुकाराम पडाळे आणि सुनील ठाकूर यांना खूप छान पार पाडली.