*उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री उदय सामंत साहेबांनी उपोषणास बसलेल्या विनावेतन कर्मचाऱ्यांचा प्रश्न ४८ तासात सोडवला.*
पनवेल /रायगड
शांतिनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेज नविन पनवेल तेथील कर्मचारी गेले ७ महिने विना वेतन काम करत होते. संस्था चालकाच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून २४ फेब्रुवारी पासून कर्मचारी आमरण उपोषणास बसले होते. यावेळी जिल्हा प्रमुख मा. शिरिषजी घरत साहेबांच्या आदेशाने हि बातमी जेव्हा नविन पनवेल शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना प्रणित शिक्षकसेनेला समजली तेव्हा शहर प्रमुख श्री. यतिन देशमुख आणि शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू यांनी तात्काळ उपोषणा ठिकाणी धाव घेतली. संघटीका सौ. अपूर्वा प्रभू यांनी लगेच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांच्याशी संपर्क करून उपोषण करत्या कर्मचाऱ्यांची सर्व सत्य परिस्थिती त्यांना कळवली आणि त्याच अनुषंगाने ४८ तासाच्या आत मा.श्री. उदयजी सामंत यांनी स्वतःच्या दालनात मीटिंग घेऊन सकारात्मक चर्चा करून संस्थाचालकाला कडक शब्दात आदेश देऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आणि श्री. उदयजी सामंत यांच्या हस्ते पाणी ग्रहण करून कर्मच्यारांनी उपोषण सोडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश पवार , तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल,खांदा कॉलनी शहर प्रमुख मा. सदानंद शिर्के,शिक्षक सेनेचे अजित चव्हाण ,जगदिश भगत, नाईक साहेब, मंगेश पाटील , उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, संदिप तांडेल , गणेश परब, किरण सोनावणे,राजेश वैगणकर,प्रसाद शिरोडकर, सिद्धेश गुरव,सुगंधा शिंदे, सेजल खडकबन तसेच एम.एस.बी.टी. चे अधिकारी वाघ साहेब उपस्थित होते.