धुतुम गावात विविध विकास कामांचे उदघाटन
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
दिनांक 8 मार्च 2022 रोजी महिला दिना चे औचित्य साधून उरण तालुक्यातील धुतूम गावात विविध विकास कामे ग्रामपंचायत आणि IOTL CSR अंतर्गत करण्यात आली. सकाळी प्रथम 10.15 वाजता स्मशान भूमी जवळ व्यायाम शाळेच्या कामाचे श्रीफळ सरपंच रेश्मा ठाकूर यांनी वाढविले. नंतर 11.00 वाजता आय ओ टी एल कंपनी च्या सी एस आर अंतर्गत शुध्द पाण्याचे वॉटर एटीएमचे लोकार्पण सोहळा मिलिंद मोघे यांच्या हस्ते पार पडला. व शाळेच्या पहिल्या मजल्याच्या कामाचे उद्घाटन चे श्रीफळ भूपेश शर्मा यांच्या हस्ते वाढविण्यात आले. त्या नंतर कन्या जन्माचे स्वागत योजनेचे शुभारंभ ज्येष्ठ नेते रायगड भूषण डि.आर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच प्रमाणे IOTL CSR अंतर्गत प्रत्येक परिवारास घरगुती ओला व सुका कचरा कुंड्या वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आयओटीएल IOTL तर्फे टर्मिनल मॅनेजर भूपेश शर्मा , HR आणि IR कन्सल्टंट मिलिंद मोघे, मेंटेनन्स मॅनेजर दिपक नाईक , सेफ्टी मॅनेजर दुर्गा प्रसाद त्रिपाठी, S&D इन्चार्ज प्रफुल म्हात्रे , तसेच लहास ग्रीन चे MD जाधव साहेब, साई खानोलकर , सरपंच रेश्मा ठाकूर, माजी सरपंच धनाजीशेठ ठाकूर, रायगड भूषण डी.आर.ठाकूर, ज्येष्ठ नेते प्रभाकर हरिश्चंद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सदानंद ठाकूर, सदस्या वैशाली पाटील, आशा ठाकूर, सविता ठाकूर, निर्मला ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ ठाकूर, तंटा मुक्ती अध्यक्ष दत्ता ठाकूर, मुख्याध्यापक मोकाशी सर, दत्ता ह.ठाकूर, महेन्द्र ठाकूर, सुनील ठाकूर, नंदेश ठाकूर, मेघनाथ ठाकूर, संतोष ठाकूर, साईनाथ ठाकूर, विनोद ठाकूर, जयेश राजाराम घरत, जयेश रघुनाथ घरत, हौसाराम ठाकूर, सुमित मढवी, विकास ठाकूर, एकनाथ ठाकूर, नितीन ठाकूर, प्रकाश ठाकूर, अनिरुद्ध ठाकूर, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर मान्यवर उस्थितीत होते. यावेळी स्वागत ग्रामसेवक मोरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच शरद ठाकूर आणि सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष म्हात्रे यांनी केले.