जासई हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचा शुभचिंतन व सेवापूर्ती समारंभ संपन्न.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनियर कॉलेज जासई या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन आणि या विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते ,भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.तसेच या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना त्यांच्या पुढील सुखी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी या विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांचा विशेष सत्कार केला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सदर विद्यालयाची जी भौतिक व शैक्षणिक प्रगती केली आहे आणि त्यांच्या इतर सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य आचार्य शिरोमणी पुरस्कार -2022 मुंबई येथे त्यांना प्राप्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश पाटील व शाळेचे चेअरमन अरुण जगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला . तसेच या कार्यक्रमाची प्रस्तावना बाबर एस. एम. यांनी केली.तसेच या शाळेविषयी कृतज्ञतेची भावना विद्यार्थी प्रतिनिधी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. त्याच बरोबर शिक्षक प्रतिनिधी म्हणून म्हात्रे एम.डी.मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व सेवानिवृत्त झालेल्या आपल्या सहकारी सेवकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भेट वस्तू दिली. तसेच सेवानिवृत्त सेवकांनी सुद्धा शाळेसाठी भेटवस्तू दिल्या यामध्ये घरत टी.टी.यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टिम भेट म्हणून दिली. तसेच पाटील एस. एस. मॅडम यांनी शाळेसाठी वातानुकूलित यंत्र (एसी) दिली. तसेच कोकीळ एस.डी. यांनी वॉटर प्युरीफायर दिले. बी. एल.पाटील मॅडम यांनी शाळेसाठी पंचवीस हजार रुपये देणगी दिली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य मोरे पी.पी.सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर व ग्रामस्थ विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रयत सेवक संघाच्या महाराष्ट्राचे संघटक नुरा शेख यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता दहावी ड चे वर्ग शिक्षक ठाकरे एस.पी. सर यांनी केले.