*बनावट सोने तारण ठेवून बॅंकेची फसवणूक महाड शहर पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
*शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा महाड यांची ५५ लाख ८७ हजार ३०० रुपायांची फसवणूक*
महाड/प्रतिनिधी-किशोर किर्वे
महाड:-दि.८ मार्च २०२२ रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा महाड तर्फे फिर्यादी प्रभाकर दशरथ जाधव रा.मु.पो.भासरे ता.खटाव जि.सातारा सध्या राहणार मु.चांभारखिंड ता.महाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी नं (१) सुधाकर विठोबा सागवेकर रा.शिंदेकोंड ता.महाड आरोपी नं (२) संदिप किसन पाथरे आरोपी नं(३) संदेश संदिप पाथरे रा.मु.नाते ता.महाड आरोपी नं (४) राजेश विठ्ठल जाधव रा.विन्हेरे ता.महाड आरोपी नं (५) रुतुजा राजेंद्र जाधव आरोपी नं (६) राजेंद्र किसन जाधव रा.महाड ता.महाड आरोपी नं (७) शिल्पा अशोक नगरकर रा.महाड ता.महाड आरोपी नं (८) अक्षय मंगेश बामणे रा.काचले ता.महाड यापैकी शिवकृपा सहकारी पतपेढीचे मुल्यांकनकार (गोल्ड व्हॅल्यूअर) आरोपी नं १ यांनी आरोपी नं २ ते ८ यांच्याजवळ संगनमत करून आरोपी नं २ ते ८ यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहित असतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने सदरचे बनावट दागिने सोन्याचे आहेत असे वरील आरोपी नं १ ते ८ यांनी भासवून तसेच पतपेढीतील मुल्यांकनकार आरोपी नं १ यांनी त्याच्या पदाचा दुरुपयोग करून सदरचे दागिने खोटे/बनावट आहेत हे माहित असतानाही वरील इतर आरोपी नं २ ते ८ यांनी सदरचे दागिने गहाण ठेवून आरोपी नं १ यांनी सदर दागिन्यांचे मूल्यांकन करून ते खरे आहेत असे सांगून आवश्यक ते फाॅर्म भरुन बनावटीकरण करुन त्यापोटी आरोपी नं २ ते ८ यांनी १७/९/२०२० ते ८/३/२०२२ पर्यंत कर्जाची रक्कम रोख व त्यांचे खात्यामध्ये प्राप्त करून शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा महाड यांची रक्कम रुपये ५५ लाख ८७ हजार ३०० रुपये इतक्या रकमेची फसवणूक केली म्हणून महाड शहर पोलीस ठाणे येथे दि.८/३/२०२२ रोजी काॅ.गु.र.जि.नं,२६/२०२२ भा.द.वि.कलम ४०८,४२०,४६५,४६७,४६८,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.पी.खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार पो/ह ८४४ एन.पी.वार्डे करित आहेत