संगीता ढेरे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता सचिन ढेरे यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन्मानाचा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. महिला सक्ष्मीकरण, महिला जनजागृती व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते संगीता ढेरे यांना प्रदान करण्यात आला. अलिबाग येथील पीएनपी नाट्य सभागृहात हा शानदार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशु संवर्धन सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, पनवेल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षाचे प्रतोद, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते.उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता सचिन ढेरे यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.