परिणीता वुमेन्स डे उत्साहात साजरा…
ठाणे (प्रतिनिधी-फरियल सय्यद) परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे मुंबई येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एका खास
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या दिमाखदार सोहळ्यात पोलिस, शासकीय, चित्रपट, ऑटोमोबाईल, एस्ट्रोलॉजी आणि रेस्टॉरंट अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सात महिलांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत
परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर आणि संस्थापक प्रशांत सागवेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संदिप माळवी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्वाचे परिणीता सोशल फाऊंडेशनच्या ठाणे विभाग प्रमुख अनुश्री जोशी यांच्या हस्ते नॅपकीन बुके देऊन स्वागत करण्यात आलं हे नॅपकीन बुके परिणीता सोशल फाऊंडेशनच्या अधिकृत सदस्या आणि कार्यक्रमाच्या प्रायोजिका पल्लवी कार्लेकर यांनी
तयार केले होते.
यानंतर लगेचच परिणीता सोशल फाऊंडेशनच्या www.parineetasocialfoundation.com या वेबसाईटचे अनावरण ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिणीता सोशल फाऊंडेशनचे संस्थापक प्रशांत सागवेकर यांनी केले. यावेळी त्यांनी परिणीता सोशल फाऊंडेशनचा उद्देश विषद केला, ते म्हणाले कि, घरगुती किंवा करियर म्हणून व्यवसायाकडे वळलेल्या आणि वळू पाहणाऱ्या महिलांसाठी ही संस्था सुरु करण्यात आली आहे. यात व्यवसायासोबतच महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. महिलांच्या व्यवसायाचं स्वरुप अनेकदा मर्यादित असतं ते तसं न ठेवता थोडा व्यापक विचार असला तर महिला त्याच कष्ट आणि मेहनतीमध्ये आपला व्यवसाय राज्य, देश तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ शकतात. अनेक महिलांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे, परिणीता हे एक मुक्तपिठ आहे आणि स्त्रीयांच्या व्यवसायाला पाठबळ देण्याचं काम आम्ही करत आहोत
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संदिप माळवी यांचा सत्कार परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका साक्षी
सागवेकर आणि प्रशांत सागवेकर यांनी केला. आपल्या सत्काराला उत्तर देताना संदिप माळवी म्हणाले कि, अशा प्रकारच्या संस्थांची समाजाला अत्यंत आवश्यकता असते. शासनाच्या वतीने आम्ही देखिल अशा प्रकारचे उपक्रम राबवित असतोच मात्र सामाजिक भान ठेऊन जेव्हा समाजातील नागरिकच समाजासाठी काही करु पाहतात तेव्हा आमच्या सारखे सगळेच शासकीय अधिकारी त्यांच्या मदतीसाठी तप्तर असतात..
यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात परिणीता अभिमान हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी संस्थेचे आभार मानले.. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांचे कौतुक त्यांनी यावेळी केलं सुजाता ढोले या परिणीता सोशल फाऊंडेशनला नेहमीच सहकार्य करीत असतात.. यावेळी त्या म्हणाल्या की समाजासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाच्या पाठी उभं राहणं हे आम्हा शासकीय अधिकाऱ्यांचे काम असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.
यानंतर ठाण्याच्या एसीपी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या संगिता अल्फान्सो शिंदे यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी त्यांनी आजच्या काळात होणाऱ्या सायबर क्राईमच्या घटनांपासून लांब राहण्यासाठी महिलांनी काय करणं अपेक्षित आहे हे विशद करुन सांगितलं तसच महिलांना पोलिस विभागाची भिती न बाळगता समोर येऊन बिनधास्तपणे वाईट घटना आणि व्यक्ति यांची माहिती द्यायला हवी, कायद्याची माहिती करु घेणे आवश्यक आहे अशा विविध मुद्दावर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यांनंतर संस्कृती कला दर्पणच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांना गौरविण्यात आलं त्यांनी महिलांना मानसिक ताण विरहीत आयुष्य जगायला हवं, आलेल्या वेळेचा सदुपयोग करा, महिला दिवस एक दिवस नाही तर तो संपूर्ण वर्षभर असतो तेव्हा भरभरुन जगा.. आयुष्य एंजॉय करा असा सल्ला दिला..
त्यानंतर भावना ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका अपर्णा शहा यांचा सन्मान करण्यात आला त्या म्हणाल्या कि महिलांनी जर ठरवलं तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मी आज ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे माझ्याकडे गाड्यांच्या अनेक ब्रॅण्डसच्या फ्रान्चायसीज आहेत पण मला कधीच माझ्या कामाचं ददडपण येत नाही, माझे पती राजेश शहा यांच्या मदतीने आणि सहकार्याने मी खंबीरपणे माझ्या क्षेत्रात उभी आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा न घाबरता, ताण तणावात न राहता काम करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असे त्या यावेळी म्हणाल्या..
त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा मराठी बिग बॉस विजेत्या मेघा धाडे यांचा देखील परिणीता अभिमान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मेघा यांनी आपलं आव्हानात्मक आयुष्य यावेळी उपस्थितांसमोर मांडलं. पती आणि पत्नी यांच्यात जर उत्तम संवाद असेल, तर पती नक्कीच पत्नीच्या मागे ठामपणे उभे राहतात हा विश्वास स्वत:च्या उदाहरणासह त्यांनी उपस्थित महिलांना दिला. काळा बरोबर चाललं पाहिजे.. महिलांनी एका चौकटीत स्वत:ला बांधून न घेता चौफेर मार्गक्रमण केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने यशस्वी होता येतं असं त्या यावेळी म्हणाल्या.
यानंतर परिणीता एस्ट्रो गुरु या पुरस्काराने यावर्षी सुप्रसिद्ध अंकशास्त्रतज्ज्ञ मानसी काळे यांचा गौरव करण्यात आला. कर्मा न्युमरोलॉजी या संस्थेच्या माध्यमातून मानसी काळे गेली 15 ते 18 वर्षे अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, टेरोट कार्ड रिडिंग अशा विविध शास्त्रांचा आधार घेत नागरिकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या
अनेक स्त्रीया या आज व्यावसायिक पातळीवर यशस्वी झाल्या आहेत. आकडे, रंग, नाव अशा बऱ्याच गोष्टींची शास्त्रशुद्ध माहिती देत मानसी काळे या लोकांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन तर देतातच शिवाय त्यांचे क्लासेस घेऊन त्यांना शास्त्राशी अवगत देखील करतात. त्यांच्या या दिशा दर्शक कार्यासाठी त्यांना परिणीता एस्ट्रो गुरु या नव्या
पदवीने यावेळी सन्मानीत करण्यात आलं.. आपल्या सत्काराला मानसी काळे यांनी अगदी शांत आणि संयमीत उत्तर देत उपस्थित महिलांची मनं जिंकली.. मला आज पर्यत खूप राज्य, राष्ट्रीय स्तरावर सन्मानीत करण्यात आलं मात्र आपल्या कार्याची अशी दखल सुद्धा घेतली जाऊ शकते हे पाहून मला आज खूप आनंद झाला.. माझ्या नावा समोर आपण एक नवं पद ठेवलं आहे त्याचा मी स्विकार करते आणि या पदाचा सन्मान राखत नवं काम करण्यासाठी सज्ज होते असं त्या यावेळी म्हणाल्या.
यानंतर परिणीता संकल्पनेच्या पहिल्या अॅम्बेसिडर म्हणून मनस्विनी फु्ड्स प्रा.लि.च्या संचालिका, पूर्णब्रम्ह या रेस्टो चैनच्या सर्वेसर्वा जयंती कठाळे यांचा
परिणीता अॅम्बेसिडर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जयंती कठाळे या एक उत्कृ्ष्ट वक्त्या पण आहेत, त्यामुळे या कार्यक्रमात त्यांच्या मोटिवेशनल स्पिचचे सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या स्पिचमध्ये जयंती यांनी महिलांना छोट्या छोट्या उदाहरणांमधून व्यवसायाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. आपल्या सहज सोप्या आणि सुंदर भाषेत त्यांनी त्यांच्या व्यवसायातील अनुभव उपस्थिता सोबत शेअर केले. परिणीता अॅम्बेसिडर म्हणून गौरव केल्या बदद्ल त्यांनी परिणीता सोशल फाऊंडेशनचे आभार मानले. महिलांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आणि महिलांना सोबत घेऊन महिलांसाठी झगडणाऱ्या महाराष्ट्रातील 100 स्त्रीयांना परिणीता अॅम्बेसिडर म्हणून गौरविण्यात येणार असल्याचा मानस यावेळी परिणीता फाऊंडेशनचे संस्थापक प्रशांत सागवेकर यांनी बोलून दाखवला.
त्यानंतर कार्यक्रमात, कार्यक्रमाच्या प्रायोजिकांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यात अलंक्रिता फॅशनच्या कृपाली चौबळ यांचा समावेश होता यावेळी कृपाली यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्या महिलांना आपल्या कलेक्शन मधल्या सुंदर सुंर उंची साड्या गिफ्ट म्हणून दिल्या तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रायोजिका श्रुती आठल्ये यांनी आपल्याकडील विविध मसाले प्रमुख पाहुण्यांना गिफ्ट हॅम्परच्या स्वरुपात दिले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या प्रायोजिका गिफ्ट अॅन्ड डेकोरच्या संचालिका पल्लवी कार्लेकर यांनीपाहुण्यांना नॅपकीन बुके भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठी चित्रपट, मालिका यातील सुप्रसिद्ध गायक आणि संगितकार हर्षवर्धन वावरे यांच्या गाण्याचा एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हर्षवर्धन यांनी आपल्या सुमधूर आवाजाने उपस्थित सर्व महिलांना मंत्रमुग्ध केले.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा निवेदिका धनश्री दामले यांनी केले.