महिला दिना निमित्त सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशाखा प्रशांत ठाकूर (सरपंच-खोपटे) यांच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील माता, भगिनी, महिला बचत गट यांच्यासाठी महिला सक्षमीकरण व महिलांबद्दल जनजागृती माहिती देण्यात आली.तसेच सॅनटरी नॅपकिन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित प्रमुख वक्त्या पूनम गणेश पाटेकर (दुर्वा एंटर प्रायझेस ऑनलाईन सर्व्हिसेस), हेमा घरत (नुट्रीशन आणि हेल्थ कोच), ज्योती गजानन म्हात्रे (JNPT हॉस्पिटल ) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास सुंगधा कोळी, कलावती घरत यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, राजीप शाळा खोपटाच्या सभापती/सदस्या, शिक्षक वृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील महिला भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होते.मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल सरपंच विशाखा ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानून महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.